जगभरातून खिल्ली उडाल्यानंतर चीनने हटवला सोन्याचा माओचा पुतळा

चीन गणराज्याचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पार्टीचे दिग्गज नेता माओत्से तुंगच्या पुतळ्याला चीनच्या सरकारने हटविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jan 8, 2016, 10:53 PM IST
जगभरातून खिल्ली उडाल्यानंतर चीनने हटवला सोन्याचा माओचा पुतळा  title=

बीजिंग :  चीन गणराज्याचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पार्टीचे दिग्गज नेता माओत्से तुंगच्या पुतळ्याला चीनच्या सरकारने हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

३७ मीटर उंच अशा पुतळ्याचे निर्माण कार्य गेल्या ९ महिन्यांपासून सुरू होतो. 

 

जगभरात अशा प्रकारचा पुतळा बनिवण्याबद्दल ऑनलाइन खिल्ली उडविणात येत होती. त्यानंतर चीनी सरकारने तात्काळ निर्णय घेत पुतळा हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

चीनी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी माओच्या पुतळ्यावर काळा कपडा टाकून ते हटविण्याचे काम सुरू होते. तसे फोटोही प्रसिद्ध झाले होते. 

तीन महिन्यापूर्वी चीनी न्यूज वेबसाईटवर माओच्या पुतळ्याची बातमी आली होती. त्यानंतर त्याची खिल्ली उडविणे सुरू झाले होते.  

हा विशाल पुतळा बनविण्यासाठी ३ मिलिअन युआन म्हणजे तीन कोटी रुपये आर्थिक मदत दिली होती. जगभरात या पुतळ्याची चर्चा होती. या पुतळ्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. असा पुतळा उभारण्याऐवजी ग्रामीण नागरिक आणि शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी प्रतिक्रिया उमटत होती. या टीकेतून हा पुतळा हटविण्यात आल्याचे बोलले जाते आहे.