www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनच्या बिजिंगमधील शास्त्रन्यांनी बर्ड फ्लूचे लक्षण समजण्यावर उपाय शोधल्याचा दावा केला आहे. मानवाच्या रक्तात काही असे प्रोटीन्स असतात, जे बर्ड फ्लूच्या एच7एन9 या व्हायरसला मारण्याची क्षमता ठेवतात. या मानवी रक्तातील प्रोटीन्सचा शोध घेतल्याचा दावा चीनने केला आहे.
नेचर कम्युनिकेशनमध्ये छापून आलेल्या लेखात सांगितलं गेलं आहे की, एच7 एन9 ने ग्रासलेल्या लोकांमध्ये एंग्योटेनिज्म-2 ची क्षमता वाढते. या वरूनच कळून येते की व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूच्या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. एंग्योटेनिज्म-2 हे प्रोटीन्स शरीरातील हृदय,किडनी,रक्ताभिसरण आणि ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते.
चायनीज अकादमी ऑफ इंजिनियरिंगच्या संशोधकांनी एच7एन9 वर शोधलेल्या या उपायाने आता बर्ड फ्लूचा आजार मिटवण्यासाठी एक नवीन दिशा मिळाली आहे. 2013 साली चीनमध्ये पहिल्यांदाच बर्ड फ्यूचा रोगी मिळाला होता. बर्ड फ्यू रोग मानवी शरीरात वेगवेगळे आजार निर्माण करतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.