नवी दिल्ली : दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या क्रूरतेची कोणतीच सीमा नाही. ते महिलांना शिक्षा देण्यास जराही मागेपुढे पाहत नाही.
महिलांना शिक्षा देताना ते अत्यंत क्रूर आणि हिंसक मार्गांचा वापर करतात. सीरियाच्या मोसूल शहरात एखाद्या महिलेने शरिराचा एखादा भाग उघडा ठेवला तर तिला शिक्षा देण्यासाठी त्यांनी एका खास पद्धतीची धातूची मशीन बनविली आहे. ते याचा वापर करतात.
मोसूलच्या स्थानिक भाषेत या मशीलला 'बाइटर' किंवा 'क्लीपर' म्हटले जाते. ही मशीन इतक्या वेदना देते की शरिराचा मांस लचका तोडल्यावर ज्या प्रकारे वेदना होईल तशी वेदना यातून होते.
मीडिया रिपोर्टनुसार या महिन्याच्या सुरूवातीला मोसूलमधून पळून आलेल्या एका शाळेच्या माजी निदेशकांनी सांगितले, या मशीनने खूप वेदना होतात. तर २२ वर्षीय फातिमाने सांगितले की तिचे मुलं भूकेने मरत होते, खूप प्रयत्नांनंतर ती लपत पळ काढण्यात यशस्वी झाली.
फातिमानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयसिसची क्रुरता वाढली आहे. गेल्या महिन्यात फातिमाच्या बहिणाला खूप वेदनादायक शिक्षा दिली. तिची चूक एवढीच होती की ती बाजारात जाताना ती हातमोजे घालण्यास विसली होती.
आयसीसने महिलांना फतवा काढला की, सर्व शरीर झाकले पाहिजे. महिलांनी ढगले कपडे, हातमोजे, मायमोजे घालावे, तसेच बाहेर जायचे असेल तर पुरूषासोबत जावे.