मॉस्को : रशियातील ऑनलाइन स्पर्धेत विजेता तरूण रुस्लाम शेड्री याला पॉर्न स्टार सोबत एक महिना राहण्याचे एक अनोखं गिफ्ट मिळालं आहे.
डेली मिररने दिलेल्या बातमीनुसार रूस्लाम हे अनोखं गिफ्टमुळे खूप खूश आहे. रूस्लामला रशियन पॉर्न स्टार एकाटेरिना माकारोवा सोबत एक महिना राहण्याचे बक्षीस मिळालं आहे. १६ वर्षीय रूस्लामला हे बक्षीस कम्प्युटर गेम्सच्या व्हर्च्युअल आर्म्स विकणाऱ्या वेबसाइटवर एक लाखांवा व्हिजिटर बनण्यासाठी मिळाले आहे.
यावर पॉर्न स्टार म्हणाली की आता मला स्वतःलाही किशोरवयीन झाल्यासारखं वाटतं आहे. ती या तरूणासोबत सुट्ट्यामध्ये कुठे बाहेर जाऊ इच्छिते आहे.
रुस्लामला प्रथम या बक्षीसावर विश्वास बसला नाही. पण हे खरं असल्याचं कळाल्यावर त्या खूप आनंद झाला.
पण या बक्षिसामुळे त्याची आई नाराज आहे. ती म्हणाली १६ व्या वर्षी असं बक्षिस कोणाला कसं मिळू शकतं. माझ्या मुलांच्या परीक्षा येते आहे. त्याला अभ्यास करायचा आहे. रूस्लामची आई वेराच्या मते त्याला या बक्षिसाच्या बदल्यात एक लाख रुबल दिले जावे.