न्यूयॉर्क : तालिबानचा कुप्रसिद्ध दहशतवादी नेता मुल्ला ओमर हा जिवंत असून पाकिस्तानमधील कराची इथं दडलेला असल्याचं विधान अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाचे मुख्याधिकारी रहमतुल्ला नबिल यांनी केलं आहे.
पाश्चिमात्य गुप्तचरांनीही ओमर कराचीमध्येच लपला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘ओमर हा जिवंत आहे अथवा नाही याबद्दल अनेकदा साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र तो कराचीमध्येच असल्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे,’ असं नबील म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.