अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपद निवडणूक निकालातली चुरस शिगेला

अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीतली चुरस अचानक शिगेला पोहचलीय. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याची समसमान संधी असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलंय.  

Updated: Nov 9, 2016, 09:11 AM IST
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपद निवडणूक निकालातली चुरस शिगेला title=

वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीतली चुरस अचानक शिगेला पोहचलीय. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याची समसमान संधी असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलंय.  

फ्लोरिडा, ओहायो, नॉर्थ कॅरोलाईना, न्यू हॅम्पशायर, या सगळ्या अत्यंत महत्वाच्या राज्यांमध्ये ट्र्म्प यांना आघाडी मिळेल असं भाकित एक्झिटपोल्स वर्तवताय. त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात मोठी पडझड सुरू झालीय.  भारतीय बाजारातही मोठी घबराट पसरलीय. 

सिंगापूरच्या बाजारात निफ्टी तब्बल 273 अशांनी कोसळलाय. डॉलरच्या तुलनेत जगभरातल्या चलनांवरही ट्रम्प यांच्या सरशीचा मोठा परिणाम बघायाला मिळतोय.