अश्विनी एकबोटेंचा अखेरचा परफॉर्मन्स

Updated: Oct 23, 2016, 03:47 PM IST
अश्विनी एकबोटेंचा अखेरचा परफॉर्मन्स title=

 

पुणे : मराठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांनी शनिवारी अचानकपणे रंगभूमीवरुन एक्झिट घेतली.

भरत नाट्य मंदिरात नाट्य त्रिविधा हा कार्यक्रम सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपट तसेच नाट्यसृष्टीवर शोककळा पसरलीये.

कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना त्यांनी गिरकी घेतली आणि त्या खाली कोसळल्या. त्यांचा हा परफॉर्मन्स अखेरचा ठरला.