युवराजची भावी पत्नी हेजल हिच्याबद्दलची ५ अज्ञात सत्य

वर्ल्ड कप २०११चा हिरो युवराज सिंगने इंडोनेशियातील बालीमध्ये अभिनेत्री हेजल किचसोबत साखरपुडा केला. याला युवीने दुजोरा दिलाय. तो काल मुंबईत हेजलसोबत दाखल झाला.

Updated: Nov 13, 2015, 04:36 PM IST
युवराजची भावी पत्नी हेजल हिच्याबद्दलची ५ अज्ञात सत्य title=

मुंबई : वर्ल्ड कप २०११चा हिरो युवराज सिंगने इंडोनेशियातील बालीमध्ये अभिनेत्री हेजल किचसोबत साखरपुडा केला. याला युवीने दुजोरा दिलाय. तो काल मुंबईत हेजलसोबत दाखल झाला.

अधिक वाचा : युवीच्या साखरपुड्याचे माहिती नाही, मात्र त्याची आई खूश आहे : योगराज

३३ वर्षीय युवी हरभजन सिंगच्या लग्नाला पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत हेजल सोबत होती. त्यानंतर दोघांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु झाली. ब्रिटनमध्ये जन्मलेली २८ वर्षीय  हेजलने काही हिंदी सिनेमात काम केले आहे. तिच्याबद्दल सर्वांना माहित नसलेल्या तिच्या या पाच गोष्टी

अधिक वाचा : युवीसोबतच्या साखरपुड्याबाबत हेजल किचचे अद्यापही मौन 

- हेजल किचने सलमान आणि करीना कपूर सोबत बॉडीगार्ड सिनेमात काम केलेय.
- हेचल किचने २००७मध्ये तमिळ सिनेमा बिल्लात काम केले. हा सिनेमा डॉनचा रिमेक होता.
- हेचलने जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेय. मारुती सुझुकी, विवेल आणि स्पाईट या  जाहिरातींचा समावेश आहे.
- हेजल रियॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ७ मध्ये भाग घेतला होता.
- 'आ आंटे अमलापुरम' या हिट आयटम नंबर गाण्यामुळे ती प्रसिद्धीला आली. हेजल ही मुळची ब्रिटीश अभिनेत्री आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.