चेन्नई : 'पुली' सिनेमातील कलाकार आणि दाक्षिणेकडील सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या घरांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले.
बहुचर्चित पुली हा चित्रपट गुरूवारी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच सिनेमातील कलाकारांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याने अनेकांना धक्का बसला.
बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चेन्नई, मदुराई, कोचीन, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद येथील एकूण ३५ ठिकाणी छापे टाकलेत. अभिनेता विजय याचे घर, कार्यालय आणि रिसॉर्टवर तसेच अभिनेत्री नयनतारा आणि समंथा यांच्या घरांवर छापा मारला.
‘पुली’ सिनेमाचे निर्माते, क्रू मेंबर्स यांच्या घरावरही छापा टाकण्यात आलाय. ‘पुली’ हा सिनेमा टॉलीवूडमधील आतापर्यंत महागडा सिनेमा आहे. तब्बल १२० कोटी खर्चून सिनेमा पूर्ण करण्यात आलाय. या सिनेमात बॉलीवूड अभिनेत्री श्री देवीचीही भूमिका आहे.
पाहा ट्रेलर :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.