मुंबई : अभिनेत्री जुही चावलाने जेव्हा मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता, आणि जुही चावलाची मिस इंडिया म्हणून निवड झाली, तेव्हा ती १८ वर्षांची होती, जुही चावला आता ४७ वर्षांची आहे. जुही त्या दिवसांची आठवण करतांना म्हणते, ती घटना तिच्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारी होती.
देशांच्या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात जुही चावलाने म्हटलं आहे की, मी १८ वर्षांची असतांना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. मी जेव्हा ही मागे वळून त्या दिवसाची आठवण करते, मी विचार करते आणि मला आश्चर्याचा धक्का बसतो, मी कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करत नव्हते, यामुळे युवावस्थेत अशा घटना आपल्यासाठी अद्भुत असतात.
मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीसाठी चित्रपट उद्योगातून अनेक ऑफर यायला लागल्या, यानंतर जुहीने 'कयामत से कयामत तक', 'डर', 'हम है राही प्यार के' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
जुही म्हणते युवावस्थेत जीवन सुंदर असतं, जोश असतो, उत्साह असतो, आणि या वयात काम करण्याची उर्जा असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.