मुंबई : 'उरी'तल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना होत असलेला वाढता विरोध बघता बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या बहुचर्चित 'रईस' या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.
तिच्याऐवजी या भूमिकेसाठी दुस-या अभिनेत्रीचा शोध आता सुरू झाला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणारा हा सिनेमा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. कारण नवीन अभिनेत्रीला घेऊन या सिनेमाचं पुन्हा चित्रीकरण करावं लागणार आहे.
पाकिस्तानी कलाकारामुळे सिनेमा प्रदर्शनाला विरोध होईल या शंकेतून निर्माता रितेश सिधवानी आणि शाहरुख खान यांनी हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे करण जोहरच्या ' ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातूनही फवाद खानचा रोल रिप्लेस करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऐ दिल है मुश्किलचीही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.