मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रकृतीबद्दल अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती दिली आहे, आपलं लिव्हर हे फक्त २५ टक्के ठीक असल्याचं महानायकाने स्पष्ट केलं आहे.
अमिताभ बच्चन यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चालवल्या जाणाऱ्या, हेपेटायटीस बी विरोधी मोहिमेचे ब्रॅड अॅम्बेसेडर बनवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
आपल्याला हेपेटायटीस बी असल्याचं आपल्याला २००० साली समजल्याने बच्चन यांनी म्हटलं आहे.
जेव्हा ३३ वर्षापूर्वी शुटिंग दरम्यान बच्चन जखमी झाले होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्यासाठी रक्तदान केलं होतं, तेव्हा त्यातील एक व्यक्ती हेपेटायटीस बी ग्रस्त होता, तो आजार नंतर बच्चन यांच्याही वाटेला आला.
बच्चन यांना या आजाराची माहिती रेग्युलर चेकअपच्या वेळी २००० साली माहित झाली झाली की, माझं ७५ टक्के लिव्हर निकामी झालं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.