या पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा

 अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 15, 2017, 05:45 PM IST
या पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा title=

मुंबई :  अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत. 

एका टॉक शोमध्ये सबाला होस्टने बॉलिवूडच्या अभिनेत्यांचे फोटो दाखविले आणि त्यांची ऑफर नाकरण्याचे कारण विचारले. तेव्हा सबाने सर्व अभिनेत्यांबद्दल काही ना काही म्हटले आहे. त्यात हृतिक रोशनबाबत सबा म्हणाली तो माझ्या टाइपचा नाही. कारण तो दोन मुलांचा बाप आहे. इमरान खानचा फोटो पाहून म्हटले की तिला तोंडाचा कॅन्सर नाही करवून घ्यायचा. 

त्यावेळी अँकरने बॉलिवूडचा दबंग स्टार सलमानचा फोटो दाखविला तर ती म्हणाली सल्लूभाईची खूप भीती वाटते तो तर छिछोरा आहे. त्याला आपली स्टाइल नाही आणि त्याला डान्सही करता येत नाही. 

रितेश देशमुखला तीने बी ग्रेड हिरो म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्यांबद्दल सबाने केलेल्या वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जुना आहे पण तो सध्या व्हायरल होत आहे. कारण सबा सध्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. 

विशेष म्हणजे अभिनेता इरफान खान सोबत पाकिस्तानी अभिनेत्री सबा बॉलिवूडमध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग दिल्लीमध्ये सुरू होणार असून हा कॉमेडी चित्रपट आहे.