मुंबई : नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे राहुल महाजन. आता पुन्हा एकदा राहुल चर्चेत आला आहे. त्याला कारण आहे त्याचं तिसरं लग्न. हो, तुम्ही अगदी योग्य वाचलंत. राहुल तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.
मूळची कोल्हापूरची असणाऱ्या मराठी मॉडेल अमृता मानेशी तो आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच हे दोघे पहिल्यांदा एकमेकांना केरळमध्ये भेटले आणि आता ते लग्न करणार आहेत.
राहुलचं पहिलं लग्न २००७ साली श्वेता सिंग हिच्याशी झालं होतं. दोन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी एका टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून २०१० साली कोलकत्याच्या डिंपी गांगुलीसोबत त्याने लग्न केलं. पण, त्यांच्यात वारंवार होत असलेल्या वादामुळे २०१४ साली त्यांचा घटस्फोट झाला.
बिग बॉसमध्ये असताना पायल रोहतगीसोबतची त्याची जवळीक सर्वांनी पाहिली होती. तिथून बाहेर आल्यावर संभावना सेठसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. पण, गेल्या काही महिन्यांपूर्वी तो आणि अमृता गोव्यालाही गेले होते. तेव्हापासून त्यांच्यातील जवळीक असण्याच्या चर्चांना सुरुवात झाली. आता मात्र लग्न करणार असल्याची बातमी आहे.
Driving a super car with my super girl @amrutamane4 #AudiR8spyder pic.twitter.com/4YP9QN0tL3
— Rahul Mahajan (@TheRahulMahajan) March 23, 2016