मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळींचा लवकरच मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदीतील निर्माते, कलाकार मंडळी मराठी चित्रपटांकडे वळू लागलीत. त्यात आता संजय लीला भन्साळींचे नावही सामील झालेय.
भन्साळी ‘लाल इश्क गुपित आहे साक्षीला’ या चित्रपटाची निर्मिती करतायत. यात मराठीतील चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहे तर त्याच्यासह अंजला सुखानी, जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, कमलेश सावंत यांच्याही भूमिका असणार आहेत.
शिरीष लाटकर यांनी चित्रपटाचे लेखन केलेय. २७ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.