सोनाक्षीची रॉकस्टार कन्या अनन्या ठरली यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअर!

ओडिशा गर्ल असलेली अनन्या नंदा यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअरच्या दुसऱ्या सिझनची विजेती ठरली आहे. अनन्याने नाहिद आफ्रिन आणि नित्यश्री व्यंकटरमनला हरवून तब्बल १० लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळवली. 

Updated: Sep 7, 2015, 09:34 AM IST
सोनाक्षीची रॉकस्टार कन्या अनन्या ठरली यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअर! title=

मुंबई: ओडिशा गर्ल असलेली अनन्या नंदा यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअरच्या दुसऱ्या सिझनची विजेती ठरली आहे. अनन्याने नाहिद आफ्रिन आणि नित्यश्री व्यंकटरमनला हरवून तब्बल १० लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळवली. 

अनन्या श्रेया घोषाल आणि अरजित सिंहची मोठी फॅन आहे. तर ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी-आनंदजींमधील आनंदजी तिच्यासाठी लकी ठरलेत. रविवारी इंडियन आयडल ज्यूनिअरचा ग्रँड फिनाले मुंबईत संपन्न झाला. यावेळी नेहमीच्या परिक्षकांसोबत कॉमेडी किंग कपिल शर्मा उपस्थित होता. 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, विशाल ददलानी सोबत कपिलनं धमाल केली. संगीतकार सलिम मात्र फिनालेला हजर राहू शकले नाही. 

फिनालेला सर्व टॉप १३ स्पर्धक हजर होते. पुन्हा एकदा या सर्वांची गाणी ऐकायला मिळाली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.