'रवींद्र पाटील यांचा जबाब ग्राह्य धरता येणार नाही'

सलमान खान हिट एण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आजही निकाल वाचन सुरु केले आहे. तसच निकाल वाचना दरम्यान न्यायालयाने या प्रकणात महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवण्यास सुरुवात केलीय. 

Updated: Dec 9, 2015, 01:57 PM IST
'रवींद्र पाटील यांचा जबाब ग्राह्य धरता येणार नाही' title=

अजित मांढरे, मुंबई : सलमान खान हिट एण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आजही निकाल वाचन सुरु केले आहे. तसच निकाल वाचना दरम्यान न्यायालयाने या प्रकणात महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवण्यास सुरुवात केलीय. सलामान खानच्या गाडीचा टायर कसा फाटला यावर न्यायालयानं विशेष करुन निरिक्षण नोंदवलंय. तसंच तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांचा जबाब ग्राह्य धरता येणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलंय. 

- सलमान खानच्या गाडीचा टायर कशामुळे फुटला आणि कसा याबाबत सुनावणी दरम्यान सर्वांनी वेगवेगळी मते व्यक्त केली

- सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंग यांने त्याच्या जबाबात म्हटल्याप्रमाणे तो स्वत: गाडी चालवत होता. अचानक गाडीच्या पुढचा डाव्या बाजूचा टायर फुटला आणि अपघात झाला.

अधिक वाचा - सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा प्रवास : २००२ ते २०१५

- तर, घटनेच्या वेळी गाडीत असलेला सलमान खानचा ड्रायव्हर याने दिलेल्या जबाबानुसार अपघात झाल्याने गाडीचा टायर फुटला होता.

- टायर फुटला यावर आरटीओच्या अधिकाऱ्याने दिलेल्या जबाबानुसार अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो गाडीचा पंचनामा करण्यास गेला त्यावेळी गाडी त्याने चालवून बघितली आणि एक राऊंडदेखील मारला

- शिवाय टायर कशामुळे फुटला याबाबात तपास यंत्रणांनी फॉरेन्सीक लॅबद्वारे तपासून पाहिले नाही त्यामुळे सलमान खानच्या गाडीचा टायर कशामुळे फुटला याचे कारण स्पष्ट होत नाही.

अधिक वाचा - अपघात सलमाननं केला पण, उद्ध्वस्त झालं रवींद्रचं आयुष्य!

- रविंद्र पाटील यांनी दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी सलमान खानवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला. पण रविंद्र पाटील यांनी दिलेला जबाब हा मॅजिस्ट्रेट समोर दिला होता. तर सत्र न्यायालयात सुरु असलेल्या साक्षी दरम्यान ते गैरहजर राहिले. दरम्यानच्या काळात त्यांना निलंबित करण्यात आलं. शिवाय त्यानंतर फरार होते आणि त्यांचा मृत्यू कधी झाला हे पोलिसांनाही माहीत नव्हतं. 

- तसच खटल्या दरम्यान लक्षात येते की, 'एव्हीडन्स एक्ट ३३'नुसार रविंद्र पाटील यांचा घेतला गेलेला जबाब ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. कारण याच 'अॅक्ट ३३'नुसार या जबाबात अनेक तांत्रिक त्रुटी लक्षात येतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.