मुंबई : सुपरस्टार शाहरुख आपल्या आगामी सिनेमाच्या जोरदार तयारीत असतानाच त्याच्या कुटुंबाला एक दु:खद धक्का बसलाय.
शाहरुख खानचे सासरे आणि गौरी खान हिचे वडील कर्नल रमेशचंद्र छिब्बर यांचं मंगळवारी रात्री निधन झालंय. यामुळे खान कुटुंब दु:खात बुडालंय.
हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यानं छिब्बर यांना हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी त्यांची प्रकृती खूपच नाजूक होती. उपचार सुरू असतानाच एस्कॉर्ट हॉस्पीटलमध्ये मंगळवारी रात्री ८.५५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ही गोष्ट समजताच शाहरुखनंही तातडीने आपला पुढचे सगळी काम रद्द करत पत्नीसहीत दिल्लीला धाव घेतली. छिब्बर यांच्यावर दिल्लीतल्या लोधी कॉलनीमध्ये अंत्यसंस्कार पार पडतील.
रमेशचंद्र छिब्बर मूळचे होशियारपूर जिल्ह्यातील पट्टी गावचे... १९७० मध्ये ते दिल्लीचे रहिवासी बनले होते. सविता छिब्बर आणि रमेशचंद्र छिब्बर यांना दोन मुलं आहेत. मुलगा विक्रांत आणि मुलगी गौरी... गौरीनं शाहरुखशी विवाह केलाय. गौरी आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती.