मुंबई : शांताबाईनंतर आता सोशल मीडियावर शांताराम या गाण्याची धूम आहे. शांताबाई विरूद्ध शांताराम असा सामना रंगला आहे.
अधिक वाचा : व्हिडीओ | शांताबाईच्या ऑडीओ साँगने जिंकलं, पण व्हिडीओने भ्रमनिरास
शांताराम हे गाणे शेअर केले जात आहे ते ओरिजनल गाणे असल्याचे म्हटले जात आहे. हा वाद सुरू झाला असला तरी नेटीझन्स दोन्ही गाण्याचा आस्वाद घेत आहेत.
अधिक वाचा : भाऊ कदम यांनी साकारली भन्नाट 'शांताबाई'
शांताबाई या गाण्यावर अनेकांना आक्षेप घेतला असला तरी सर्वसामान्य श्रोत्यांना हे गाणं गंमत म्हणून का होईना खूप आवडत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे गाणं आवडत आहे. तर शांताबाई गाण्यामुळे अनेक मुलींनाही रस्त्याने येता जाताना चिडवले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अधिक पाहा : नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांचा 'शांताबाई' डान्स जलवा
‘शांताराम’ या व्हिडीओ एक म्हातारा माणूस विचित्र अंगविक्षेप करत नाचतो आहे. कमाल म्हणजे या वयोवृद्ध व्यक्तीचे वय इतके जास्त असतानाही तो अगदी आनंदाने नाचताना दिसतो आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.