उद्योन्मुख अभिनेत्रीने केली पंख्याला लटकून आत्महत्या

 बॉलिवुडची उद्योन्मुख अभिनेत्री सय्याम खन्ना उर्फ मोना खन्ना हिने आपल्या यारी रोड येथील फ्लॅटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याची माहिती अभिनेत्रीची बहिण रिया हिने पोलिसांना दिली.

Updated: Sep 3, 2014, 08:06 PM IST
 उद्योन्मुख अभिनेत्रीने केली पंख्याला लटकून आत्महत्या title=

मुंबई :  बॉलिवुडची उद्योन्मुख अभिनेत्री सय्याम खन्ना उर्फ मोना खन्ना हिने आपल्या यारी रोड येथील फ्लॅटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याची माहिती अभिनेत्रीची बहिण रिया हिने पोलिसांना दिली.

२८ वर्षीय सय्याम हिने ‘द हॉन्टेड हाऊस’ या चित्रपटात काम केले होते. तसेच तिचा ‘द लास्ट हॉरर’  हा चित्रपट  रिलीज होणार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या एक दिवस अगोदर ३० ऑगस्ट रोजी सय्यामने आपल्या बहिणीला भाजी खरेदी करून आणण्यासाठी सांगितले होते. रियानुसार घरातून बाहेर निघण्यापूर्वी सय्याम हिने गळाभेट घेतली आणि सांगितले मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तसेच घरी परतल्यावर मला डिस्टर्ब करू नको, रात्री जेवण करून झोपून जा, मी आराम करणार आहे, असे सय्यामने सांगितले.

रिया बाजारातून परत आली रात्रभर टीव्ही पाहत होती. त्यावेळी बहिणीच्या खोलीतून गाण्याचा आवाज येत होता. तिने विचार केला की तिची बहिण आयपॉडवर गाणे ऐकत ऐकत झोपून गेली. पण रियाने आपल्या बहिणीच्या खोलीत पाहिले तेव्हा ती पंख्याला लटकली होती. त्यानंतर रियाने पोलिसांना सूचीत केले.

पोलिसांनी सांगितले की, सय्यामने एक सुसाइट नोट सोडली आहे. यासाठी तिने कोणालाही जबाबदार धरले नाही. तसेच कोणाचीही चौकशी करू नये. असेही यात म्हटले आहे.  दरम्यान, मृतकच्या बहिणीनुसार तिची बहिण असं काही करणार नाही. यामागे तिच्या बॉयफ्रेंडचा हात असण्याची शक्यता आहे.

सय्याम हिचा बॉयफ्रेंड एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. त्याने अनेकवेळा सय्यामला मारलेही आहे. माझी बहिण अनेक दिवसांपासून अपसेट होती. तो तिच्याकडे दुर्लक्ष करीत होता. ज्या दिवशी घटना घडली तेव्हाही सय्याम आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. ती घरी आली तेव्हा निराश होती. शेवटचा कॉलही त्या बॉयफ्रेंडला केला होता. सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.