अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Updated: Oct 25, 2014, 05:36 PM IST

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

फुफ्फुसांचा विकार झाल्याने अमरापूरकर यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्यापलीकडे एक सुजाण नागरिक म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर सर्वांना परिचीत आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांची बाजू सदाशिव अमरापूरकर यांनी मांडली. तसेच डीजे लावून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार केली. त्यावेळी काही जमाव त्यांच्या घरात शिरला. यावेळी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.