'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातामध्ये निधन झाले.

Updated: Jun 23, 2015, 06:31 PM IST
'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू title=

कॅलिफोर्निया : संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातामध्ये निधन झाले.

'टायटॅनिक' या चित्रपटालाही जेम्स हॉर्नर यांनी संगीतबद्ध केलं होतं. जेम्स हॉर्नर यांना 'टायटॅनिक'साठी ऑस्कर मिळाला होता.हॉर्नर 61 वर्षांचे होते. 

हॉर्नर यांच्या वैयक्तिक विमानास अपघात झाल्याचे काल सकाळी जाहीर केले होते, ‘हॉर्नर हेच विमान उडवत होते‘ असं सहाय्यक पायलटने सांगितलं आहे.

एकच इंजिन असलेल्या या विमानाचे अवशेष येथील दुर्गम भागात असलेल्या नॅशनल पार्कमध्ये सापडले. या अपघातामुळे जंगलात आग लागली आणि ती दोन एकरांपर्यंत पसरली, असे पोलिसांनी सांगितले.   

'माय हार्ट विल गो ऑन' हे प्रचंड गाजलेले गाणेही हॉर्नर यांचेच होते. चार दशकांहून अधिक काळ हॉर्नर चित्रपटसृष्टीत सक्रिय होते.

'ब्रेव्हहार्ट', ‘अ ब्युटिफुल माईंड‘, 'अवतार', 'एलियन्स' आणि 'अपोलो 13' या चित्रपटांच्या संगीतासाठीही हॉर्नर यांना ऑस्करचे नामांकन मिळाले होते.

हॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी संगीतकारांमध्ये हॉर्नर यांचे नाव अग्रस्थानी होते. 1997 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'टायटॅनिक' या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना दोन ऑस्कर मिळाले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.