मुंबई : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा वरदान आशीर्वाद हा बंगला आता पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी तीन किंवा चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे.मुंबईतील कार्टर रोडवरील राजेश खन्ना यांचा बंगला आहे.
या बंगल्यावर राजेश खन्ना यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची नेहमीच गर्दी होत असे, राजेश खन्ना यांचं २०१२ मध्ये निधन झाले. हा बंगला शशी शेट्टी या व्यावसायिकाला ९५ कोटी रुपयांना विकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
एक-दोन महिन्यांत हा बंगला पाडण्यात येणार आहे, या ठिकाणी नवी इमारत उभारण्याचे काम सुरू होणार आहे. सध्याचे बांधकाम ५० वर्षे जुने आहे, येथे पुन्हा नव्याने बांधकाम करण्याची गरज असल्याचं उद्योजकाने ए इंग्रजी माध्यमाशी बोलताना म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.