करिनाचा अॅटिट्युड 'बादशाहो'च्या आड आला?

अजय देवगनसोबत 'बादशाहो'मध्ये काम करण्यास करिनानं नकार दिलाय हे तर आता सर्वांनाच माहीत झालंय... पण, तिनं का बरं या सिनेमाला नकार दिला असावा? याबद्दल तिलाच विचारण्यात आलं तेव्हा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या करिनानं काही धक्कादायक उत्तरं दिलीत. 

Updated: Mar 22, 2016, 08:41 AM IST
करिनाचा अॅटिट्युड 'बादशाहो'च्या आड आला? title=

मुंबई : अजय देवगनसोबत 'बादशाहो'मध्ये काम करण्यास करिनानं नकार दिलाय हे तर आता सर्वांनाच माहीत झालंय... पण, तिनं का बरं या सिनेमाला नकार दिला असावा? याबद्दल तिलाच विचारण्यात आलं तेव्हा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या करिनानं काही धक्कादायक उत्तरं दिलीत. 

या बद्दल करीनाला विचारलं असता करीनानं म्हटलं, मला खूप चांगलं वाटतंय की मी दुसऱ्यांना काम दिलं... ज्या सिनेमांना मी नकार दिलाय त्या सिनेमांत काम करून इतर लोक मोठे स्टार बनू शकतील, अशी मी आशा करते. 

'माझ्या बहिणीनं केलं असेल... पण, मी नाही...'

माझ्या बहिनीनं भले डेविड धवनसोबत काम करून आपलं करिअर बनवलं असेल... पण, मी मात्र चांगल्याच सिनेनिर्मात्यांसोबत काम करणार... मी त्यातली नाही जे कोणतेही सिनेमे स्वीकारतात. 

माझ्या पद्धतीनं वागा

मी विवाहीत आहे... आणि मी त्याच्याचसोबत काम करेल जे माझ्या पद्धतीनं आपलं शेड्युल मॅनेज करतील. मी 'दिल धडकने दो' यासाठी केला नाही कारण मी माझ्या पती आणि कुटुंबापासून दूर तीन महिने क्रूजवर जाऊ शकत नव्हते. 

भन्साळीबद्दल काय म्हणाली... 

संजय लीला भन्साळी एकदम कन्फ्युज्ड व्यक्ती आहे. त्याला माहित नाही की काय करायचंय. आपल्या वक्तव्यावरून कधीही पलटी मारतो. मी एकदम फ्लॉप जरी ठरले तरी मी त्याच्यासोबत काम करणार नाही. 

मी सलमानची फॅन नाही... 

मी बिलकूल सलमानची फॅन नाही... मी त्यालाही सांगते की तो किती विचित्र अॅक्टींग करतो. तो खूपच घाणेरडा अभिनेता आहे. 

माधुरी - श्रीदेवीही हीट नव्हत्या... 

माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की मी टॉपवर आहे... माधुरी दीक्षितनं नऊ फ्लॉपनंतर आपला पहिला हिट सिनेमा दिला होता... आणि श्रीदेवीनं तर आपल्या संपूर्ण करिअरमध्ये ब्लॉकबस्टर दिलेला नाही.

दरम्यान, हा सिनेमा मिलन लुथरिया दिग्दर्शित करत आहे. या सिनेमात नवाब सैफ अली खानलाही एक भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण, नवाबही जास्त मानधनाच्या बाबतीत अडून राहिल्यानं हेही जमून आलं नाही. उल्लेखनीय म्हणजे, रंगून या सिनेमातही सैफला कंगनाहून कमी मानधन दिलं जातंय.