www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
गोष्ट प्रेमाची असेल तर मग व्यक्तीची उंची, रंग, डोळे, केस, भाषा वगैरे वगैरे सगळं मागे पडतं, असं आपण आत्तापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल. पण, एका ताज्या अभ्यासात मात्र आपल्या या वाक्याला साफ चुकीचं ठरविण्यात आलंय. या अध्ययनाप्रमाणे महिला स्त्रीत्व किंवा संरक्षणार्थ उंच पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात.
टेक्सासस्थित राईस विश्वविद्यालयात समाजशास्त्रचे प्राध्यापक मायकल इमरसन, एलिन आणि ग्लॅडिस क्लाईन यांच्या म्हणण्यानुसार विकासात्मक मनोविज्ञान सिद्धांतानुसार मनुष्य आपल्या जोडीदाराच्या निवडीत `समानते`ला सर्वात जास्त महत्त्व देतो.
या अध्ययनात दिल्या गेलेल्या आकड्यांनुसार, कोणतीही महिला उंच पुरुषाकडे आकर्षित होण्यामागे संरक्षण आणि स्त्रीत्वाची भावना काम करतात.
`एक मुलगी असल्यानं मी एकाच वेळेस स्वत:ला नाजूक आणि सुरक्षित असल्याची भावना पसंत करते. आपल्या प्रियकराच्या नजरेत स्वत:ला कमी लेखणं थोडं विचित्र वाटतं. मी त्याला माझ्या मिठीत घेऊ इच्छिते ज्यामुळे मी त्याच्या गळ्यांत माझे हात गुंफू शकेन`, असं या अध्ययनासाठी एका महिलेनं आपली भावना व्यक्त केलीय.
पुरुषांची उंची आणि प्रेम संबंध याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. पुरुष मात्र अनेकदा स्त्रियांच्या उंचीबद्दल चर्चा करताना दिसतात. शारीरिक ताळमेळ न बसणाऱ्या कमी उंचीच्या मुलींसोबत प्रेम मात्र पुरुषांना असतं.
हे अध्ययन शोधपत्रिका `फॅमिली इश्यूज`च्या ताज्या अंकात प्रकाशित करण्यात आलंय. हे अध्ययन एकप्रकारे पितृसत्ताक समाजाच्या मान्यतेचाच पुरस्कार करताना दिसतं. ज्यामध्ये पुरुषांना अधिक अधिकार प्राप्त असतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.