मुंबई : राजकारण म्हटले की पुरूषांचे वर्चस्व असते. पण यंदा आपणही कमी नाही आणि राजकारणात आपणही पुरूषांना धूळ चारू शकतो, हे राज्यातील विविध पक्षांच्या नवनिर्वाचित २० महिला आमदारांनी दाखवून दिले आहे.
गेल्या विधानसभेच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता. विधानसभेत केवळ ११ महिला होत्या. नव्या विधानसभेतील सर्वाधिक १२ महिला आमदार भाजपाच्या आहेत. तसेच ५ काँग्रेसच्या, तर ३ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत.
यंदा तब्बल २७६ महिला निवडणूक रिंगणात होत्या. १९९५ ते २००९ या काळात विधानसभेतील महिलांची संख्या ११-१२ पर्यंतच मर्यादित होती. त्यापूर्वीही केवळ १९८० मध्ये सर्वाधिक १९ महिला निवडून आल्या होत्या. आता २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत महिलांची टक्केवारी ७.२ टक्के झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.