पुणे : १६ वर्षाच्या एका तरुणीवर दोन वर्षात १००हून अधिक वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीप्रमाणे तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे
पीडित मुलीला पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने पुण्यात आणलं गेल आणि जबरदस्तीने तिला वेश्याव्यवसायात पाठवलं. अखेर दोन वर्षानंतर ही तरुणी पुण्याहून दिल्लीला पळून आली आणि तिथे पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला.
ही घटना पुण्यात घडल्याने शनिवारी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे ट्रांसफर करण्यात आलं. याप्रकरणी ११३ लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी सिलगुडी येथे राहणारी आहे. जानेवारी २०१४ मध्ये पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने तिच्या मित्राने तिला पुण्यात आणलं. मात्र त्यानंतर तिला तिथे वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं.