पुणे : पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळातील गैरव्यवहार प्रकरणाची आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चौकशीची मागणी केली आहे. झी २४ तासनं गेल्या काही दिवसांपासून शिक्षण प्रसारक मंडळी या प्रसिद्ध आणि जुन्या शिक्षण संस्थेतील गैरकारभारावर प्रकाश टाकलाय.
राज्य सरकारनंही या गैरकारभाराची दखल घेऊन चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं. तर नुकतेच धर्मादाय आयुक्तांनीही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. पुण्यातील काही सामाजिक संघटनांनीही शिप्र प्रकरणी आंदोलन करत दोषी संचालकांवर कारवाईची मागणी केलीये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.