नाशिक : मुंबईत पाणीपुरीच्या पाण्याच्या भांड्यात लघवी करणारा भैय्या आपण पाहिला होता. तसा आता नाशिक शहरात टाकू भाजीपाला लोकांना भेळमध्ये देणारा विक्रेता सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या मागचं गौड बंगाल जाऊन घेतलं आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी....
चायनीजमध्ये पत्ता कोबी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. भाजीपाला खाल्ल्यास शरीराला पोषक द्रव्ये मिळतात असे डॉक्टर्स ही सांगतात. त्यामुळे आपण सलाड मोठ्या प्रमाणात खातो. मात्र हाच सलाड कसा असतो याचा पर्दाफाश झी २४ तास करणार आहे.
खुद्द नाशिक शहरातील एक भेळवाला बाजार समितीत फेकून देण्यात आलेला भाजीपाला वेचतानाची धक्कादायक दृश्ये झी मीडियाच्या हाती आली आहे. नाशिक शहरातील एम जी रोडवर चना जोरगरम विकणाऱ्या या विक्रेत्याची दृश्ये अत्यंत धक्कादायक आहेत. बाजार समितीतील फेकून देण्यात आलेला भाजीपाला हा विक्रेता उचलत आहे. तसा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आपल्याला आपण काय खात आहात याची कल्पना येईल ....
इतके होऊनही हा विक्रेता मात्र मी खूप पोषक भाजी खाऊ घालतो असा दावा करतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो भाजीपाल्यांचा रस लोकांना खाऊ घालत होता त्यामुळे त्यातही तो आशयाचा भाज्या वापरून रस पाजत होता अशी शंका निर्माण झाली आहे. मूळचा संगमनेरच्या या विक्रेत्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी योगेश खरे यांनी
स्थानिक लोकांशी चर्चा केली असता अशा विक्रेत्यावर औषध प्रशासन कारवाई का करत नाही याचा सवाल उपस्थित केला आहे. अनेक जण यामुळे आजारी पडल्याच सांगतायेत
आपण पाहू या हा धक्कादायक व्हिडिओ..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.