मुंबई : सध्या, बहुचर्चित अशा 'बाजीराव-मस्तानी' सिनेमामुळे संपूर्ण भारतभर पेशव्यांची चर्चा जोरदार सुरु आहे... आणि यामुळे, मकरसंक्रांतीच्या दिवसाची महाराष्ट्राची काळी आठवण पुन्हा एकदा जागी झालीय.
१४ जानेवारी १७६१.... हाच तो दिवस ज्या दिवशी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली युद्ध लढणाऱ्या मराठ्यांना सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. जवळपास २५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट... पण, मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्यांना आजही ही गोष्ट महत्त्वाची वाटते.
पानिपतचं तिसरं युद्ध
त्याला कारणही तसंच आहे. दिल्लीपासून उत्तरेकडे जवळपास ९७ किलोमीटर अंतरावर पानिपतच्या तिसरं युद्ध लढलं गेलं. १८ व्या शतकातलं हे सर्वात मोठं युद्ध मानलं जातं. एका दिवसात सर्वात जास्त मनुष्यहानी होणारा हाच तो दिवस...
अहमद शाह अब्दालीच्या अफगाण फौजांनी मराठ्यांचा जोरदार पराभव केला होता. महाराष्ट्रातील पातदूर इथून सुरुवात झालेल्या युद्धात तब्बल १० महिने झुंज दिल्यानंतर मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात सर्वनाश झाला होता.
मराठ्यांचा मुस्लिम सेनापती
उल्लेखनीय म्हणजे, यावेळ मराठ्यांचा सेनापती होता तो इब्राहिम खान... इब्राहिम हा दख्खनी मुस्लिम होता. १७६१ मध्ये अफगाण फौजांकडून इब्राहिम मारला गेला.