पुणे : सीबीआय अधिकारी बनून राजकारणी आणि व्यापा-यांना लूटणाऱ्या ठकसेनाची कहाणी तुम्ही स्पेशल छब्बीस या सिनेमात पाहली असेल. रुपेरी पडद्यावरची ही कहाणी पुण्यात उघडकीस आलीय. केंद्रीय दक्षता पथकाचा अधिकारी असल्याची बतावणी करुन एका ठकसेनाने कोट्यवधीचा गंडा घातलाय. तर त्याच उधळपट्टी पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन राजकारणी आणि व्यापाऱ्यांच्या काळ्या संपत्तीवर हात साफ करणारे अधिकारी तुम्ही सिनेमातून आजवर बघितले असतील. तसाच काहीसा प्रकार पुण्यात पाहायला मिळाला. सिल्व्हर स्क्रिनवरची ही कहाणी पुण्यात घडलीय आणि या कहाणीचा सूत्रधार आहे तोतया अधिकारी विशाल पांडुरंग ओंबाळे. त्याचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
नाव : विशाल पांडुरंग ओंबाळे
वय : ३८ वर्ष
शिक्षण : दहावी नापास
पत्ता : स्पार्टन एनक्लेव्हज, येरवडा, पुणे
पेशा : तोतया केंद्रीय अधिकारी
एकेकाळी हॉटेलात भांडी साफ करणाऱ्या दहावी नापास विशाल ओंबाळेने मोठ्या चलाखीने पुण्यातील अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातलाय. आपण केंद्र सरकारच्या दक्षता पथकाचा अधिकारी असल्याचं सांगून त्यांने पुण्यातील व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये उकळले आहेत.
लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्याने आपल्या गाडीला लाल दिवा बसवला होता. तसेच त्याच्या दिमतीला ७ ते ८ सासगी बॉडीगार्ड असत त्यामुळे व्यापारी तो सगळा लवाजमा पाहून घाबरुन जावून त्याच्या जाळ्यात अडकत असतं.
पुण्यातील कॅम्प परिसरातील एका मोबाईल दुकानदाराला अशाच प्रकारे लूटण्याच्या प्रयत्नात विशाल ओंबाळेचं बिंग फुटलं. केंद्राचा अधिकारी बनून व्यापाऱ्यांना लुटण्यासोबतच कमी व्याजदरात कर्ज मंजूर करतो, सरकारी कोट्यातून फ्लॅट मिळवून देतो, नोकरी मिळवून देतो, अशी आमिषं दाखवून त्याने अनेकांची फसवणूक केली. यातून त्याने कोट्यवधीची माया जमा केल्याचं पोलीस चौकशीत पुढे आले.
अबब कितीही उधळपट्टी
- वैद्यकीय उपचारासाठी ६० लाख रुपयांचा खर्च
- फाईव्ह स्टार हॉटेलचा खर्च ४० लाख रुपये
- सुरक्षा रक्षकांचा पगार २८ लाख रुपय
- ऑफिस इंटेरिअर २५ लाख रुपये
- बार बालावर उधळले २० लाख रुपये
- महागड्या गाड्यांची खरेदी १६ लाख रुपये
- विमान प्रवासावर खर्च १२ लाख रुपये
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.