पंढरपूरात विठ्ठल-रखुमाई दर्शनासाठी वारकऱ्यांची मांदियाळी

पंढरपूरसह राज्यात आषाढीचा उत्साह आहे, आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात आली. यावेळी पूजेचा मान हिंगोलीच्या धांडे दाम्पत्याला मिळाला. राघोजी धांडे आणि संगीता धांडे मागील १६ वर्षांपासून पंढरीची वारी करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धांडे या वारकरी दाम्पत्याचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

Updated: Jul 27, 2015, 11:14 AM IST
पंढरपूरात विठ्ठल-रखुमाई दर्शनासाठी वारकऱ्यांची मांदियाळी title=

पंढरपूर : पंढरपूरसह राज्यात आषाढीचा उत्साह आहे, आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात आली. यावेळी पूजेचा मान हिंगोलीच्या धांडे दाम्पत्याला मिळाला. राघोजी धांडे आणि संगीता धांडे मागील १६ वर्षांपासून पंढरीची वारी करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धांडे या वारकरी दाम्पत्याचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्यातील अवर्षणाचं सावट दूर होवो, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडं घातलं.यावेळी राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे, तसेच बबनराव लोणीकर उपस्थित होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.