धुळे : धुळे जिल्ह्यातल्या म्हसदी इथल्या शिव-विश्वेश्वर मंदिरात मध माश्यांच्या हल्ल्यात तब्बल ७० भाविक जखमी झाले आहेत.
या मंदिरात शिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. दरवर्षीप्रमाणं यंदाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अशातच दुपारी मंदिरालगत असेलेल्या मधमाशांच्या पोळ्यावर कोणीतरी दगड मारला आणि मधमाश्या बिथरल्या. त्यांनी यात्रेला आलेल्या भाविकांवर हल्ला केला.
यात 70 भाविक जखमी झाले. मात्र यामुळं यात्रेत मोठा गोंधळ उडाला. यातल्या पाच जणांना गंभीर चावा असल्यानं त्यांना धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तर इतर जखमींवर साक्रीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मधमाश्यांच्या हल्ल्यामुळं मात्र गावातील दोन दिवस चालणारी यात्रा पहिल्याची दिवशी संपली.