नाशिक : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव सोनुजी आहेर आज मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. डॉ. दौलतराव आहेर यांच्यावर देवळा येथे आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी आरोग्य मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी वसंतदादा साखर कारखाना सुरु व्हावा असा आग्रह धरला होता. अनेक वर्षे विठेवाडीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची धुरा सांभाळली. आहेर यांनी आमदारकीपासून खासदार, मंत्री, तापी खोरे महामंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली.
देवळा तालुक्याची निर्मिती, राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी राजीव गांधी आरोग्य योजनेची स्थापना, आरोग्य विज्ञान विद्यापीठ निर्मिती, नाशिक येथे भव्य आणि सर्व सोईसुविधा युक्त संदर्भ सेवा रुग्णालयाची मुहूर्तमेढ तसेच अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या पाणलोट क्षेत्राच्या योजना अशी कामे केली.