पुणे : फर्ग्युसन कॉलेजमध्ये आज भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्रे फडणवीसांनी विद्यार्थ्यांना धडे दिले. व्हिजन 2014 चं सादरीकरण यावेळी फडणवीस यांनी केलं. या व्हिजन 2014 मध्ये शिक्षण, प्रशिक्षण, शेती, उद्योग, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
भाजपचं व्हिजन 2014 अंमलात आणलं तर महाराष्ट्र हे देशातलं अग्रगण्य राज्य होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यातील सर्व समस्यांवर उत्तर म्हणजे सुशासन, त्यातून भ्रष्टाचाराला आळा बसेल.लोकायुक्तांच्या अधिकारात वाढ करायला पाहिजे.
अँटी करप्शन ब्युरो लोकायुक्ताच्या अधिकारात आले पाहीजे. चौकशी करता सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसावी. सेवा हमी विधेयक. ई-गव्हर्नन्सची आवश्यकता असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.