सांगली : ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर विष्णू गायकवाड याला अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी ४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर-सांगली पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. मुंबई येथून या त्यांना ताब्यात घेतले. मुंबई, संकेश्वर आणि कोल्हापूर येथून या चौघांना ताब्यात घेतले. दरम्यान, समीर याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन मोबाइल हॅंडसेटही जप्त करण्यात आलेत.
अधिक वाचा : पानसरे हत्या प्रकरण : आरोपी गायकवाड 'सनातन'चा पूर्णवेळ कार्यकर्ता
समीरच्या घरावर पोलिसांनी गुरूवारी छापा टाकला. यावेळी पोलिसांना समीरच्या घरातून एकूण २३ मोबाईल, एक मोठा चाकू आणि सनातन संस्थेचे प्रचार साहित्य मिळाले. याशिवाय, कर्नाटकमध्ये राहणाऱ्या समीरच्या मेहुण्यालाही कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी २००० फोन्स कॉल चेक केल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिक वाचा : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पहिली अटक; पोलिसांचा सांगलीत छापा
कोण आहे हा समीर?
- समीर गायकवाड हा मूळचा संकेश्वर, कर्नाटक येथील रहिवासी
- त्याचे वडील सांगली आकाशवाणीमध्ये नोकरीला होते.
- पत्नी डॉक्टर असून ती सध्या गोव्यात वास्तव्य
- गोव्यातील बॉम्बस्फोट प्रकरणात संशयित रुद्र पाटील (रा. जत, सांगली) याचा समीर मित्र
- समीरचे सांगलीत मोबाइल शॉपीचे दुकान होते
- दुकानातूनच तो सनातन संस्थेचा प्रचार करायचा
सनातनचा दावा
पोलिसांनी अटक केलेला समीर गायकवाड हा सनातनचा पूर्णवेळ साधक आहे. तो निर्दोष आहे. त्याला या प्रकरणात पोलिसांनी गोवले आहे, असा दावा सनातने केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.