अंबरनाथ : परीक्षेत मार्क वाढवून घेण्यासाठी तसंच मौजमजेसाठी पैशांची गरज भासल्यानं तिघा मित्रांनीआपल्याच मित्राच्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली असून, त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
आरोपी वीरेंद्र नायडू (२२), अश्विनी सिंग (२२) आणि विशाल भोसले (१७) हे एकत्र शिकत होते. आदित्य उमरोटकर याच्यासोबत त्यांची मैत्री होती. आदित्यची आई स्नेहल उमरोटकर (५२) या १८ ऑक्टोबरला घरात एकट्याच असताना त्यांची हत्या करण्यात आली.
त्यांनी चॅट करताना आदित्यची आई घरात एकटी असल्याची माहिती काढली आणि त्याचे घर गाठले. क्लोरोफॉर्मनं बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्नेहल यांनी प्रतिकार केल्यानं या तिघांनी कटरच्या साहाय्यानं त्यांची हत्या केली. त्यांनी २0 हजार रुपये आणि मंगळसूत्र चोरले. मार्क वाढवून घेण्यासाठीआरोपींना पैशांची गरज असल्यानं आणि मजा करण्यासाठी या पैशांचा वापर ते करणार होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.