कल्याण : कल्याण पश्चिमेकडच्या मिलिंद नगर भागात राहणाऱ्या जन्नतबी नावाच्या महिलेनं, कल्याण क्राईम ब्रान्चमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यावर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केलाय. प्रमोद शिंदे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
आपली मुलगी सुलताना हिच्याशी प्रमोद शिंदे याचे दोन वर्षांपासून प्रेमसबंध होते. प्रमोदचं लग्न झालं असतानाही त्यानं सुलतानाला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. सुलतानाने प्रमोदकडे लग्नासाठी तगादा लावला होता.
१० सप्टेंबरला प्रमोदनं सुलतानाला जेवायला बोलावलं. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुलतानाचा मृतदेह लोढा जवळच्या नदी किनारी आढळला. याप्रकरणी पोलीस आत्महत्येचा दावा करत असले तरी प्रमोदी शिंदेनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप जन्नतबी यांनी केलाय.
या तक्रारीनंतर पोलिसांनी सुलतानाचा मृतदेह पुन्हा एकदा शवविच्छेदनासाठी पाठवलाय. त्याच्या अहवालानंतरच या प्रकरणाचं गूढ सुटू शकेल. दरम्यान, प्रमोद शिंदेची ठाणे कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.