मुंबई : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या चाव्या प्रस्थापितांच्याच हाती कायम राहिल्या आहेत. जिल्हा बँकांच्या निवडणुकीत अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ खडसे, दिलीपदादा देशमुख, पंकजा मुंडे-पालवे यांच्या गटांनी दणदणीत विजय मिळवला. जिल्हा बँकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पुणे जिल्हा बँकेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनलने २१ पैकी १७ जागा मिळवल्या. सहा जागा बिनविरोध आल्याने केवळ १५ जागांसाठीच मतदान झाले होते. त्यातील १३ जागा राष्ट्रवादीने मिळवल्या. नगर जिल्हा बँकेत कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरात गटाने २१पैकी ११ जागा मिळवत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला.
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आलाय. रयत परिवर्तन पॅनलचे अवघे ( पतंगराव कदम, विशाल पाटील गट ) - 6 उमेदवार विजयी झाले. तर शेतकरी सहकारी पॅनल (जयंत, मदन,संजय पाटील गट)- 15 जागांवर विजय मिळाला. तसंच आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील विजयी , सुरेश पाटील हे शेतकरी सहकारी पॅनल (जयंत,मदन,संजय पाटील गट) पॅनलचे उमेदवार
सांगली जिल्हा मध्यवर्ती अंतिम निकाल-
सांगली- विजयी उमेदवारांची नावं
विशाल पाटील - रयत
उदयसिंह देशमुख - शेतकरी
गणपती सगरे - शेतकरी
अनिल बाबर - शेतकरी
विक्रम सावंत - रयत
प्रताप पाटील - रयत
महेंद्र लाड - रयत
विलासराव शिंदे - शेतकरी
सुरेश पाटील - शेतकरी
संजय काका पाटील - शेतकरी
डी. के. पाटील - शेतकरी
सी.बी पाटील - रयत
संग्राम देशमुख - शेतकरी
मोहनराव कदम - रयत
श्रद्धा चरपले - शेतकरी
कमल पाटील - शेतकरी
बाळासाहेब व्हनमोरे - शेतकरी
सिकंदर जमादार - शेतकरी
चंद्रकांत हक्के - शेतकरी
दिलीप तात्या पाटील - शेतकरी
मानसिंगराव नाईक - शेतकरी
सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीत राज्यमंत्री दीपक केसरकर याना धक्का बसला आहे निवडणुकीत युती १९ पैकी अवघ्या ४ जगा मिळाल्या तर आघाडीने १५ जाग मिळवत सत्ता राखली आहे . अलीकडे कोकणात राणेंच्या पदरी अपयश पड़त असताना जिल्ह्या बॅंकेतील या यशाने नारायण राणे याना दिलासा मिळाला आहे. मात्र या निवडणुकीतही राडा पाहायला मिळाला काँग्रेसकडून राजन तेली यांच्या विरोधात घोषणा बजी केल्याने संतप्त झालेल्या तेली यानी दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला. सुमारे ५ मिनिटे दोन गट समोरासमोर भिडले. या निवडणुकीत केसरकर यानी उभ्या केलेल्या पॅनलमधून माजी आमदार राजन तेली, पुष्पसेन् सावंत पराभूत झालेत. अवघ्या ४ जागा युतीला मिळाल्या आहेत. दरम्यान निवडणुकीच्या पर्शभूमीवर जिल्ह्यतील वातावरण तणाव पूर्ण बनलं आहे.
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत रयत परिवर्तन पॅनलचे ( पतंगराव कदम, विशाल पाटील गट ) - ५ उमेदवार विजयी शेतकरी सहकारी पॅनल (जयंत, मदन,संजय पाटील गट)-७ उमेदवार विजयी तसेच आर आर पाटील यांचे बंधू सुरेश पाटील विजयी , सुरेश पाटील हे शेतकरी सहकारी पॅनल (जयंत,मदन,संजय पाटील गट) पॅनलचे उमेदवार
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजप, सेना , राष्ट्रवादीच्या देवकर गटाची सरशी, २१ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय, राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांच्या लोकमान्य शेतकरी पनेल ला केवळ ३ जागांवर यश एकनाथ खडसे यांच्या पॅनलचे बहुमत
नांदेड : जिल्हा बॅंक निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का बसला आहे. २१ पैकी ५ जागा काँग्रेसला तर सर्वपक्षीय पॅनलला १६ जागा मिळाल्यात.
सिंधुदुर्ग : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या गुंडशाहीमुळे आमचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया पराभूत राजन तेली यांनी व्यक्त केली. तर राजन तेलीच गुंड आहे, असे राणे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावरुन जोरदार राडा झाला. प्रकरण हातघाईवर आले आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग : भाजपचे राजन तेली आणि काँग्रेस नेते नारायण राणे समर्थक आमनेसामने आल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. राजन तेलींच्या पराभवानंतर राणे समर्थक कार्यकर्त्यांनी केली होती घोषणाबाजी
बाळासाहेब थोरात यांची बाजी
अहमनगर : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळ पॅनलला ११ जागांवर विजय मिळाला असून, त्यांच्या विरोधात उभे असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या जिल्हा विकास आघाडी पॅनलला १० जागांवर विजय मिळाला आहे. जिल्हा बॅंकेवर थोरात गटाची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसते आहे.
जयंत पाटील यांना जोरदार धक्का
सांगली : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत गुरुवारी माजी आमदार आणि जयंत पाटील यांच्या शेतकरी पॅनलचे उमेदवार मदन पाटील यांचा त्यांचे चुलत बंधू विशाल प्रकाशबापू पाटील यांनी चार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार जयंत पाटील यांचे शेतकरी पॅनल आघाडीवर असले तरी त्यांचे महत्त्वाचे उमेदवार मदन पाटील यांना पराभवाचा झटका बसला आहे. विशाल पाटील हे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचे धाकटे बंधू आहेत.
पुणे : जिल्हा बँकेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवीत आपले वर्चस्व राखले. ६ जागा बिनविरोध झाल्या.
जळगाव : जिल्हा बॅंक निवडणुकीत भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पॅनलने २१ पैकी १ ८ जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व राखले. तर राष्ट्रवादीने ३ जागांवर विजय मिळविला.
परभणी : जिल्हा बँकेत १५ पैकी ८ जागांवर निकाल जाहीर झाले आहेत. त्यापैकी ६ जागांवर रामप्रसाद बोर्डिकरांचे वर्चस्व राहिले, तर २ जागा देशमुख गटाला मिळाल्यात.
लातूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिलीपराव देशमुख यांचा वरचष्मा कायम राहिला आहे. येथील १९ पैकी १७ जागा त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने जिंकल्या आहेत. भाजपचे रमेश कराड यांच्यासह दोन विरोधक येथे निवडून आले.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीत ४ जागा बिनविरोध. शेतकरी शाहू विकास आघाडी ( कांग्रेस+राष्ट्रवादी+संजय मंडलिक-सेना, जनसुराज्य) - १० जागा, छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी : ( सेना +भाजप ) १ जागा तर आपक्ष नरसिंग गुरनाथ पाटील हे विजयी झालेत.
मुंबई : हौसिंग सोसायटी गटातून शिवसेनेच्या २ जागा आल्या. एकूण ४ जागा शिवप्रेरणा पँनलला, १६ पैकी १२ जागा सहकार पँनेलला तर ४ जागा शिवप्रेरणा पँनलला, आमदार सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर विजयी
सिंधुदुर्ग : काँग्रेसचे नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर वर्चस्व. राणे यांच्या संकल्प सिद्धी पॅनलचे वर्चस्व. शिवसेना भाजपच्या पॅनलचा १७ विरुद्ध २ ने उडवला धुव्वा. तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राजन तेलींच्या विरोधात् घोषणा
सिंधुदुर्ग : अनुसूचीत जाती प्रवर्गातून आत्माराम ओटवणेकर विजयी तर भटक्या विभक्तमध्ये गुलाबराव चव्हाण विजयी, ओबीसीतून विद्याप्रसाद बांदेकर विजयी
अहमदनगर : आतापर्यंत १८ जागांचा निकाल हाती. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाला १० जागा तर थोरात गटाला ११ जागा
मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलची बाजी. विजयी उमेदवार
- विठ्ठल भोसले
- संदीप घनदाट
- भिकाजी पार्ले
- प्रसाद लाड
- जयश्री पांचाळ
- अनिल गजरे
- शिवाजीराव नलावडे
- आनंद गोळे
- प्रविण दरेकर
- जिजाबा पवार
- सिध्दार्थ कांबळे
- नंदकुमार काटकर
शिवप्रेरणा पॅनल (शिवसेना)
- अभिजित अडसूळ
- सोमदेव पाटील
मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलला १५ पैकी १२ जागा, शिवप्रेरणा पॅनलला २ जागेवर विजय
अहमदनगर : आतापर्यंत १८ जागांचा निकाल हाती. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाला १० जागा तर थोरात गटाला ९ जागा
नांदेड : जिल्हा बँक निवडणुकीतील १४ जागांचे निकाल जाहीर, अशोक चव्हाण यांच्या पॅनेलला ५ तर शेतकरी विकास पॅनलला ९ जागा.
सिंधुदुर्ग : सहकार वैभव पॅनलच्या राजन तेलींचा पराभव, नारायण राणे गटातील प्रमोद धुरी यांनी केला पराभव.
बीड : पंकजा मुंडे-पालवे गटाने धनंजय मुंडे गटाचा केला पराभव.
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश पाटील आणि भाजपचे हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बँक विकास पॅनलला मोठ यश मिळाले. या पॅनलमध्ये भाजप,शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या एकत्रित सर्वपक्षीय नेत्यांच पैनलने निवडणुकीत २० पैकी १९ जागा जिंकल्या आहेत. तर त्यांच्या विरोधातील उत्कर्ष पॅनलला एका जागेवर यश मिळवता आले आहे. त्यामुळ बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेल्या काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, रामकृष्णबाबा पाटील, ज्ञानेश्वर जगताप, प्रभाकर पालोदकर, भाजपाचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संदीपान भुमरे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण आणि अभिजीत देशमुख यांना यश मिळाले आहे.
रत्नागिरी : युतीच्या शिवसंकल्पचे किरण सामंत , सुधीर कालेकर, अनिल जोशी, आदेश आंबोलकर गणेश लाखण (दुग्ध विकास) , तर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सहकारमधून महादेव सप्रे , राजेंद्र सुर्वे, रमेश दळवी, बाबाजी जाधव, तानाजीराव चोरगे, उदय बेलोसे (कुकुट पालन), शेखर निकम (कृषी पणन), संजय रेडीज (नागरी पतसंस्था), दीपक पटवर्धन (गृहनिर्माण), दिनकर मोहीते (मच्छीमार) मधुकर टिळेकर ( औद्योगिक) हे विजयी झालेत.
सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीत भाजप शिवसेना पुरस्कृत सहकार वैभव पॅनेलचे प्रमुख राजन तेली यांना पराभवाचा धक्का बसला तर कॉंग्रेसचे प्रमोद धुरी विजयी झालेत. मालवणमधून कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस विजयी त्यांना ३१ पैकी मिळाली २४ मते मिळालीत. वैभववाडीतून दिगंबर पाटील विजयी झालेत. त्यांना २५ पैकी मिळाली १७ मते मिळाली. सावंतवाडीतून युतीचे प्रकाश परब विजयी तर काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष डी.बी.वारंग पराभूत झालेत. वेंगुर्लेतून काँग्रेसचे मनिष दळवी पराभूत तर कुडाळमधून प्रकाश मोरे विजयी तर माजी आमदार पुष्पसेन सावंत पराभूत झालेत.
जिल्हा सहकारी बँक विजयी उमेदवार :
मुंबई : शिवप्रेरणा पॅनल १, सहकार पॅनल ३
रत्नागिरी : सहकार पॅनल १२ , शिवसंकल्प पॅनल ५
सिंधुदुर्ग : काँग्रेस-राष्ट्रवादी पॅनल ७, युती पॅनल २
नांदेड : एस-भाजप-राष्ट्रवादी युती पॅनल ९, काँग्रेसचे ५
सातारा : राष्ट्रवादी पॅनल ७, अपक्ष २
धुळे : कॉंग्रेस-राष्ट्रवादी पॅनल ६, भाजप पॅनल १
अहमदनगर : विखे-पाटील पॅनल ९, थोरात पॅनल ५
लातूर : कॉंग्रेस पॅनेल १७ , भाजप पॅनल २
बीड : पंकजा मुंडे पॅनल १६ , धनंजय मुंडे पॅनल ३.
सिंधुदुर्ग : राजन तेली पराभूत
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का.
मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलला ४ जागा, शिवप्रेरणा पॅनलला एका जागेवर विजय
मुंबई : शिवप्रेरणा - अभिजीत अडसूळ तर सहकार पॅनलचे विठ्ठल भोसले, संदीप घनदाट, भिकाजी पार्ले हे विजयी उमदेवार
रत्नागिरी : शिवसंकल्प गटाचे किरण सामंत (रत्नागिरी), सुधीर कालेकर (दापोली), अनिल जोशी (गुहागर), आदेश आंबोलकर (लांजा) हे विजयी झालेत तर सहकार पॅनलचे महादेव सप्रे (राजापूर), राजेंद्र सुर्वे (संगमेश्वर) , रमेश दळवी (मंडणगड), बाबाजी जाधव (खेड) डॉ. तानाजी चोरगे (चिपळूण) यांनी आपल्या जागा जिंकल्या आहेत.
सिंधुदुर्ग : शिवसेना-भाजपचे पुष्पसेन सावंत पराभूत, राजन तेली पिछाडीवर
मुंबई : जिल्हा बॅंक निवडणुकीत २१ जागांपैकी ३ निकाल लागले आहेत. सहकार पॅनल २ तर शिवप्रेरणा पॅनल १ जागांवर विजयी
रत्नागिरी : सहकार पँनल ११ तर शिवसंकल्प ५ जागांवर विजयी
सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार ७ जागांवर विजयी, दोन ठिकाणी अपक्षांची सरशी
रत्नागिरी : जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलची घौडदौड, ९ जागांवर विजय
धुळे : जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी ६ जागांवर विजयी, भाजपचा उमेदवार १ जागेवर विजयी
सिंधुदुर्ग : काँग्रेस-राष्ट्रवादी पॅनलला ७ जागा, युतीच्या पॅनलला २ जागा
रत्नागिरी : जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलला ८ जागा.
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात गटात चुरशीची लढत पाहायला मिळतेय. निकालात थोरात गटाचं वर्चस्व मोडीत काढत विखे पाटील गटानं आघाडी घेतलीय. विखे पाटील गटाचे ९ उमेदवार विजयी ठरलेत. तर ५ जागांवर थोरात गटानं सरशी घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे नजरा लागल्यात.
रत्नागिरी : जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलला ७ तर शिवसंकल्प ५ जागांवर विजयी. २० जागांसाठी झालं होतं मतदान.
लातूर : जिल्हा बॅंकेवर काँग्रेसचे वर्चस्व १९ पैकी १७ जागा जिंकल्या २ जागांवर भाजपची सरशी
सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली असून पहिल्या दोन जागांवर काँग्रेस आघाडी विजयी ठरलीय. तर एका जागेवर युतीचा उमेदवार विजयी ठरलाय. या बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय. राणे विरुद्ध राजन तेली असा सामना इथं रंगतोय.
बीड : जिल्हा सहकारी बॅंकेवर पंकजा मुंडे गटाचे वर्चस्व दिसून आलेय. धनंजय मुंडे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले असून पंकजा मुंडे गटाला १६ जागा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे ४ उमेदवार विजयी झाले असून सत्ताधारी राष्ट्रवादी - काँग्रेस गटाला धक्का बसला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.