राज ठाकरेंना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद - आठवले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. 

Updated: Jul 29, 2014, 06:04 PM IST
राज ठाकरेंना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद - आठवले title=

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. 

नागपुरात आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.  विधान सभा निवडणुका संबंधी जागा वाटपाच्या चर्चा सुरु असतानाच, महायुतीची सत्ता आल्यास सत्तेत १५ % भागीदारी आणि राज्य विधान परिषदेच्या ४ जागा आपल्या पक्षाला मिळण्याची मागणी आठवले यांनी केली. शिवाय देशाच्या कुठल्याची राज्याचे राज्यपालपद किवा केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपालपद मिळण्याची मागणी देखील आठवले यांनी आज यावेळी केली. 

एकीकडे विधान सभेकरता जागा आखणी करताना रिपब्लिकन पक्षाच्या इतर मागण्या वाढत असल्याचे चित्र आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी करत असताना, अनुसूचित जमातीच्या कोट्यातून किंवा वेगळ्या प्रकारे त्या समाजाला आरक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी केली. बेळगाव प्रश्नावर कर्नाटक सरकारची भूमिका बघता त्या सरकारला बरखास्त करण्याची मागणी देखील त्यांनी केली. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.