सातारा : खटाव-माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गरजू आणि होतकरू युवकांना व्यक्तिमत्व, कौशल्य विकास आणि उद्योग प्रशिक्षण देण्याचं काम, मुंबईस्थित कंपनीद्वारे एक महिला कर्मचारी करते.
त्या महिलेच्या व्हॉटसअॅपवर अश्लील मेसेज, इमेज आणि व्हिडीओ पाठवत, त्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा त्या महिलेनं गोरे यांच्याविरोधात नोंदवला आहे.