प्रवासी- मालवाहतूकदार संघटनांचे राज्यात चक्काजाम आंदोलन

राज्यात आज रिक्षा, टॅक्सी, ट्रक, ट्रॅक्टर, स्कूल व्हॅन, लक्झरी बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल झालेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.

Updated: Jan 31, 2017, 08:47 PM IST
प्रवासी- मालवाहतूकदार संघटनांचे राज्यात चक्काजाम आंदोलन title=

मुंबई, जळगाव : राज्यात आज रिक्षा, टॅक्सी, ट्रक, ट्रॅक्टर, स्कूल व्हॅन, लक्झरी बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल झालेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.

केंद्र सरकारच्या परिवहन खात्यानं वाहनविषयक विविध शुल्कात केलेली भरमसाठ शुल्कवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी प्रवासी तसंच मालवाहतूकदार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे राज्यात तसेच जळगाव जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

शहरात रिक्षा, टॅक्सी, ट्रक, ट्रॅक्टर, स्कूल व्हॅन, लक्झरी बस बंद ठेवण्यात आले. कोल्हापुरातही रिक्षा आणि टॅक्सी पूर्णपणे बंद आहेत. 

या बंदचा नेहमीप्रमाणं कोल्हापूरकरांसह पर्यटकांनाही फटका बसलाय. तर रत्नागिरी जिल्ह्यातले 10 ते 12 हजार रिक्षा चालक आंदोलनात सहभागी झाले होते. ही वाढ अन्यायकारक असल्याचं म्हणत राज्यभरातील रिक्षा संघटनांनी चक्का जाम आंदोलन केले.