www.24taas.com , झी मीडिया , मुंबई
टोलच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा लेखाजोखा कॅगन तपासून पाहिला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या कामाबाबत कॅगने नाराजी व्यक्त केल्याचं सुत्रांकडून समजतयं.
चार आठवड्यांच्या आत आपलं म्हणण सादर करण्याचे आदेश कॅगने महामार्ग प्राधिकरणाला दिलेले आहेत. टोलच्या उत्पन्नाचा वापर कसा होतो हे तपासण्यासाठी महालेखापालांकडून ऑडीट नुकतच करण्यात आलं.
महालेखापालांनी केलेल्या ऑडीटचा अहवाल लवकरच केंद्र सरकारला सादर होणार आहे. टोल नाक्यांसंदर्भात काही तक्रारी असल्यास १८००११६०६२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नागरिकांना केलयं.
तक्रार करण्यासंबंधीचा टोल फ्री क्रमांक टोल नाक्यावर दिसेल अशा ठिकाणी लावण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले असल्याचे समजते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.