व्हॉट्सअॅपमुळे एकाचा जीव वाचला

व्हॉट्स अॅप म्हणजे टाईमपास. मात्र याच व्हॉट्सअॅपचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय. ए डी कांबळे यांचा प्राण व्हॉट्स अॅपमुळे वाचलाय. कांबळे गेले काही दिवस पिंपरी चिंचवडच्या वाय. सी. एम. रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत होते, कांबळेंना डायलॅसिसची गरज होती.मात्र त्यासाठी त्यांना दुर्मिळ एबी निगेटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती. 

Updated: Nov 19, 2014, 09:22 PM IST
व्हॉट्सअॅपमुळे एकाचा जीव वाचला title=

पिंपरी चिंचवड : व्हॉट्स अॅप म्हणजे टाईमपास. मात्र याच व्हॉट्सअॅपचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय. ए डी कांबळे यांचा प्राण व्हॉट्स अॅपमुळे वाचलाय. कांबळे गेले काही दिवस पिंपरी चिंचवडच्या वाय. सी. एम. रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत होते, कांबळेंना डायलॅसिसची गरज होती.मात्र त्यासाठी त्यांना दुर्मिळ एबी निगेटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती. 

सर्व रक्तपेढ्या ढुंडाळूनही रक्त मिळेना, तेव्हा अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी व्हॉटस अपवर रक्तगट आणि संपर्कसाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक पाठविला. हा संदेश त्यांच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचला. आणि तिथून तो सर्क्युलेट झाला. व्हॉट्सअपच्या सहाय्यानं अखेर त्यांना जिवदान देणारी व्यक्ती सापडलीच.
 
आपल्यामुळे एक जीव वाचल्यानं भानुदासही समाधानी आहेत. व्हॉट्स अॅप चा वापर बहुतांश वेळा मनोरंजनासाठीच होतो. मात्र याच व्हॉट्सपनं एकाचा जीव वाचवलाय.आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यापेक्षा वेगळा तो कसा असू शकेल?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.