आघाडीचा जाहीरनामा, कोणा कोणा येणार कामा?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज आघाडीने आपला जाहीरनामा जाहीर करण्यात आले. मुंबईतल्या २००० सालांपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या घोषणेसह अनेक आश्वासनांची खैरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

Updated: Feb 8, 2012, 08:52 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईतल्या २००० सालांपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या घोषणेसह अनेक आश्वासनांची खैरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. यात अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईतल्या झोपड्यांना सीआरझेड नियमांतून शिथिलता देण्याचं आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. यासह वनजमिनींवर असलेल्या ४० हजार झोपड्यांचं पुनर्वसन करणार असल्याचं वचनही जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. यासह मुंबईला खड्डेमुक्त करण्याचं महत्त्वाचं आश्वासन या जाहीरमान्यात आहे.

 

मुंबईकरांना मुबलक पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार, सार्वजनिक वाहगतूक व्यवस्था सुधारणार, पूर्व पश्चिम उपनगरांसाठी नवी हॉस्पिटल्स यासारख्या अनेक आश्वासनांची खैरात या जाहीरनाम्यात आहे.  मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी बीएमसीच्या मराठी शाळांची गळती थांबवणार, शाळांचा चेहरामोहरा बदलणार, मराठी ग्रंथालयांना निधी देणार, यासारख्या आश्वासनांची समावेश करण्यात आला आहे.