'अजितदादा' खडसेंना म्हणतात 'खामोश'

विधानसभेत अजितदादा आणि खडसेंमध्ये खडजंगी झाली आहे. विरोधीपक्ष नेते खडसेंनी मोठ्यांदा बोलू नये, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.

Updated: Apr 9, 2012, 03:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

विधानसभेत अजितदादा आणि खडसेंमध्ये खडाजंगी झाली आहे. विरोधीपक्ष  नेते खडसेंनी मोठ्यांदा बोलू नये, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. त्यावर, माझा आवाज असाच मोठा आहे आणि विरोधकांचा आवाज दाबू नका, असा पलटवार खडसेंनी केला.

 

सरकारमधील काही मोठे मंत्री हे कॅगच्या कचाट्यात अडकले आहे. त्यावरच विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसेने आवाज उठवला. त्यामुळे खडसेनेनी उचलेला मुद्दा यामुळे विधानसभेत गदारोळ झाला.

 

आपल्याकडे अजून काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावाही खडसे यांनी केला आणि संधी मिळाल्यावर ते बाहेर  काढणार असल्याचं ख़डसेंनी सांगितलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसे यांना टार्गेट केले. आणि त्यांना आवाज कमी करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अजित पवार आणि खडसें यांच्यात  चागंलीच जुंपली.