अण्णांची प्रकृती आणखी बिघडली

दिल्लीत संसदेत लोकपाल विधेयकावर मतदान होत असतानाच मुंबईत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी एक अम्ब्युलन्स एमएमआरडीए मैदानावर आणण्यात आली आहे.

Updated: Dec 27, 2011, 11:07 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

दिल्लीत संसदेत लोकपाल विधेयकावर मतदान होत असतानाच मुंबईत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी एक अम्ब्युलन्स एमएमआरडीए मैदानावर आणण्यात आली आहे.

सकाळपासून स्थिर असलेली अण्णांची प्रकृती आज पुन्हा खालावली असून त्यांना सायंकाळीनंतर ताप पुन्हा ताप आला होता.  अण्णाच्या छातीत जंतू संसर्ग असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविण्याची शक्यता आहे.

त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज सायंकाळी त्यांच्या प्रकृती तपासली  त्यावेळी त्यांना १०२ ताप असल्याचे लक्षात आले. दरम्यान अण्णांना ताप जरी असला तरी त्यांचे ब्लडप्रेशर सामान्य आहे.

अण्णांनी अशा तापाच्या स्थितीत उपोषण करून नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु त्यांनी डॉक्टरांचा सल्ला झुगारून उपोषणाला बसले आहेत. अण्णांचा ताप वाढल्यानंतर टीम अण्णाने त्यांना उपोषण सोडण्याचा आग्रह केला. परंतु, अण्णा आपल्या निर्णयावर ठाम राहून उपोषण कायम ठेवले आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रकृती खालावल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारे यांना फोन करून ही विनंती केली.

गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी असलेल्या अण्णा हजारे यांचा ताप आज सायंकाळी पुन्हा वाढला. सायंकाळी केलेल्या तपासणीत त्यांचा ताप १०२ डिग्रीपर्यंत वाढला होता. त्यामुळे त्यांना उपोषण सोडण्याची टीम अण्णांनी विनंती केली होती. आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः अण्णांना फोन करून उपोषण सोडण्याचे विनंती केली आहे.

अण्णांनी गेल्या दोन दिवसांपासून काही खाल्लं नाही. त्यांना तापही आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावे आणि केवळ धरणे आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी अण्णांना केले. अण्णांनी मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

Tags: