Maharashtra Assembly Election 2024: महायुती सरकारच्या शपथविधीच्या हालचाली सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. या सगळ्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे मात्र दरे गावात आलेत. एकनाथ शिंदे यांचं साताऱ्यातील दरे हे मूळ गाव आहे. या गावात त्यांची शेती आहे. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं असताना एकनाथ शिंदेंनी गावची वाट धरलीये.
एकनाथ शिंदे राजकीय कोलाहलातून वेळ काढून दरे गावात येतात. त्यांच्या दरे गावातील दौऱ्याला दरवेळी एक अर्थ असतो. यावेळीही त्यांनी दरे गावाची वाट धरलीये. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते काय करतात याकडं सर्वाचं लक्ष लागलंय. एकनाथ शिंदेंच्या दरे गावातल्या दौऱ्याबाबत काही विशेष वाटत नाही. दरे गावात एकनाथ शिंदेंच्या मनाला शांती लाभत असल्याचं शिरसाटांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे हे महायुतीतले अत्यंत महत्वाचे भाग आहेत. एकनाथ शिंदेंच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामुळं सरकार स्थापनेच्या हालचाली मंदावल्यात..भाजपचा विधिमंडळ गदनेता निवडीनंतरच पुढच्या हालचाली होणार असल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय हालचाली मंदावल्यात.
एकीकडे मुंबईतील मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनाची आवराआवर सुरू असतानाच नागपूरमध्ये नवीन सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या तयारीची लगबग सुरूये...डिसेंबरच्या तिस-या आठवड्यात नागपूरचं हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे...संपूर्ण सरकारी यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे.. विधानभवन परिसरात तयारीवर अखेरचा हात फिरवण्यात येतोय... सभागृहात सदस्यांसाठी अद्यावत यंत्रणा बसवण्यात येतेय. शिवाय विधानभवन परिसरात सीसीटीव्हीही बसवण्यात येत आहेत..तर मंत्र्यांचे बंगल्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे कामही जोरात सुरू आहे