सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...'

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिलीय.

नेहा चौधरी | Updated: Feb 14, 2025, 09:46 PM IST
सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...' title=

Maharashtra Ladki Bahin Yojana Latest Updates: महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय आहे. याबद्दल महिलांमध्ये फार उत्सुकता दिसून येते. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार की सुरु राहणार याबद्दल महिलांमध्ये संभ्रम आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या सुरु असून याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

त्यात सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजनेवर ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं काय होणार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थिती झाले आहेत. अशात लाडकी बहीण योजनेबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.सूर्य चंद्र असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याचा महिलांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सुरु असल्याचं ही त्यांनी म्हटलंय. 

सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे 

लाडकी बहीण’ योजनेचा आर्थिक भार महाराष्ट्र सरकारला झेपत नाही व आता निवडणुका जिंकून झाल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते. लोक आळशी बनले आहेत. लोक काम करायला तयार नाहीत. त्यांना फुकट राशन व महिन्याला पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजरचनाच बिघडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे परखडपणे सांगितले. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कर्जाच्या ओझ्याखाली दडपून गेला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही 205 लाख कोटी कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरून तडफडते आहे. भारताचे कर्ज सतत वाढत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यावर साधारण साडेसहा लाख कोटींचे कर्ज आहे. 

अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार?

काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे, असं धुणी भांडी करण्याऱ्या महिला सांगतात. ही योजना कधीही बंद होणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.