www.24taas.com, मुंबई
आगीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयाला झळ पोहचली. मात्र लोकांना विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यायी जागेतून कारभार न करता मंत्रालयात बसूनच काम पाहणार आहेत.
त्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांचा वापर केला जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठकही मंत्रालयामध्येच होणार आहे. मंत्रालयातल्या आगीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन पाहणी केली.
काही मंत्र्यांनी पर्यायी जागेत आज आपल्या कामांना सुरुवात केली. पतंगराव कदम, मधुकरराव चव्हाण यांनी कामकाजाला सुरुवात केली तर राणे, भुजबळ, जयंत पाटील, राजेंद्र दर्डांनी पर्यायी जागेतल्या कार्यालयांना भेट दिली.